Cloves Farming | आपल्याकडे अनेक प्रकारची शेती केली जाते. त्याचप्रमाणे लवंगाची शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सुगंधी लवंगाची शेती कशी करतात हे माहित आहे का. या सुगंधी लवंगाच्या शेतीची माहिती आज आम्ही देणार आहोत. हे पीक अत्यंत फायदेशीर पीक आहे यात तुम्हाला चांगला आर्थिक नफा होतो त्याचप्रमाणे तुमच्या उत्पन्नात देखील भर पडते.
हवामान आणि जमीन
आपल्याला जर लवंगाचे पीक घ्यायचे असेल, तर लवंगा ला उष्ण आणि आद्र असलेले हवामान लागते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा या ठिकाणी किनारपट्टी आहे. आणि या ठिकाणी या झाडांची वाढ देखील चांगली होते. या पिकाच्या लागवडीसाठी क्षारयुक्त जमीन टाळा.
रोपांची निवड आणि लागवड | Cloves Farming
- तुम्हाला जर चांगली लागवड हवी असेल तर तुम्ही चांगल्या प्रतीच्या रूपांची खरेदी करा.
- तुमची रोपवाटिका तयार करा आणि जमिनीची देखील तयार करा आणि त्यानंतर त्यात सेंद्रिय खत टाका.
- तुम्ही जर पावसाळ्यात करणार असाल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला सात ते आठ मीटर अंतराने हे रोप लावले तर चांगले येईल.
- झाडाला आधार द्यावा लागेल आणि त्याची काळजी देखील घ्यावी लागेल.
- झाडाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि पोषक तत्त्वासाठी झाडाला नियमितपणे पाणी देणे आणि खत टाकणे खूप गरजेचे आहे.
- त्याचप्रमाणे जमिनीची खोड काढणे आणि झाडांभोवती स्वच्छता राखणे देखील खूप गरजेचे आहे.
- या झाडावर किडी आणि रोग पडतात त्यावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे.
- झाडांची वेळोवेळी छाटणी करून त्यांना योग्य आकार द्यावा लागतो.
कापणी आणि प्रक्रिया
- या झाडांची लागवड केल्यानंतर जवळपास सात ते आठ वर्षांनी या झाडाला फळ यायला चालू होतात.
- लवंग पूर्णपणे वाळल्यानंतरच त्याची कापणी करायला सुरुवात करा.
- संपूर्ण सूर्यप्रकाशात हे पीक चांगले वाळवा आणि त्यानंतर ते साठवा.
फायदे आणि बाजारपेठ
- लवंगाची मागणी ही बाजारात नेहमीच असते आणि त्याला चांगला देखील भाव मिळत असतो.
- त्याचप्रमाणे या झाडापासून सुगंधी तेल देखील मिळते त्यामुळे लवंग हे एक दीर्घकालीन पीक आहे त्यामुळे झाड एकदा लावल्यानंतर अनेक वर्ष त्याच्या पासून आपल्याला उत्पादन मिळते.