CM Annapurna Yojana | या महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत; जाणून घ्या नवी योजना

CM Annapurna Yojana

CM Annapurna Yojana | राज्य सरकारने राज्यातील सगळ्या नागरिकांचा विचार करून विविध योजना आणलेल्या आहेत. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. या आधीच महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. अशातच आता महिलांसाठी सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले आहे. आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आत्तापर्यंत घरातील गॅस जोडणी ही पुरुष सदस्याच्या नावावर होती. त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता सरकारने या योजनेत बदल करून हा लाभ महिलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

काय आहे सरकारची अन्नपूर्णा योजना | CM Annapurna Yojana

सरकारच्या या नवीन अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जातात. या योजनेचा उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करता यावा. आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेता यावी हा आहे. आतापर्यंत घरातील गॅस कनेक्शन पुरुष सदस्याच्या नावावर होती. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ नव्हता. परंतु आता सरकारने या योजनेत बदल करून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेले कनेक्शन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याची सुविधा केलेली आहे.

या योजनेचा उद्देश | CM Annapurna Yojana

सरकारने ही अन्नपूर्णा योजना काढलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच महिलांना आता स्वच्छ इंधनाचा वापर करता येईल. तसेच त्यांचे आरोग्य देखील सुधारेल. तसेच या निर्णयामुळे जास्तीत जास्त महिलांना या गॅस सिलेंडरचा लाभ होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक बचत देखील केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेली स्वतःच्या नावावर हस्तांतरित करावी. आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळेल.