सुनीता केजरीवाल यांचा आज वाढदिवस, अरविंद केजरीवाल पत्नीला देणार का ‘विजयाची भेट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल पुढील काही तासांत जाहीर केला जाईल. मतमोजणीनुसार ७० विधानसभा जागांचा ट्रेंड आला आहे. मतमोजणीचा सुरुवातीचा कल लक्षात घेता आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने सुमारे ५० जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे २० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सर्व जागांवर पिछाडीवर आहेत.

‘आप’च्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या दिशेने पाऊल टाकल्यामुळे ‘आप’च्या कार्यर्त्यांमध्ये उत्साह आहे. पक्ष कार्यालयात उत्सवाचे वातावरण आहे. आपचे मुख्यालयात ‘लगे रहो केजरीवाल’ हे अभियान गीत वाजवल जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाषणासाठी स्टेज तयार केला जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालाखेरीज केजरीवालांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस असून मुख्यमंत्री त्यांच्या पत्नीला विजयाची भेट देणार आहेत असं सध्या दिसत आहे.

सुनीता केजरीवाल यांच्या वाढदिवसाचा आनंद आम आदमी पक्षाच्या संभाव्य विजयाने द्विगुणित झाला आहे. आपचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या घरी येऊ लागले असून मुख्यमंत्री केजरीवाल यांना विजयासोबतच त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि ते सध्या आघाडीवर आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment