मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी भाजपाचे आमदार पृथ्वीराज देशमुख प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे भाजपाचे नेते उपस्थित होते.ढोल-ताशांचा गजर,मोटर सायकल रॅली, पुष्पवृष्टी अश्या वातावरणात महाजनादेश यात्रा जिल्ह्यात दखल झाले आहे.इस्लामपूर येथून पलूस, तासगाव, मिरज आणि सांगली असा या महाजनादेश यात्रेचा मार्ग आहे. जिल्ह्यातील भाजपाकडून या जनादेश यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे सायंकाळी सांगली मधुन ही महाजनादेश यात्रा कोल्हापूर कडे रवाना होणार आहे.

Leave a Comment