हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CM Rekha Gupta Attacked । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जनता दरबार सुरु असतानाच हा हल्ला झाला असून हल्लेखोराने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावल्या आहेत. सदर व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्याशेजारी जाऊन आरडाओरडा केला आणि त्यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याने हा हल्ला का केला? तो कोणत्या इतर पक्षाशी संबंधित आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं? CM Rekha Gupta Attacked
दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात रेखा गुप्ता यांचा जनता दरबार भरला होता. त्यावेळी सदर हल्लेखोराने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, निवेदन देताच तो आक्रमक झाला… त्याने आरडाओरडा केला आणि रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. या व्यक्तीने एक नव्हे तर अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या (CM Rekha Gupta Attacked). त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केली. रेखा गुप्ता आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार झटापट झाली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.
या घटनेनंतर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तही रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पोलिसांनी सदर हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. आरोपी आत मध्ये कसा घुसला आणि तो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला? त्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला का केला? कोणत्या राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा विरोधकांचा कट असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. एक मुख्यमंत्री सतत जनतेत राहून लोकांचे प्रश्न सोडवत आहे, लोकांना भेटत आहे हे विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळे यामागे राजकीय कट असल्याचे दिसते. दिल्ली पोलिस चौकशी करत असून लवकरच या हल्ल्यामागचे तथ्ये बाहेर येतील असं मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हंटल.




