ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरे भेट होणार नाही; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी ममतादिदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही.

संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत ट्विटरवरुन माहिती दिलीय. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होत नाहीत. अशावेळी मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडे सात वाजता ममताजी हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहेत’, असं ट्विट राऊत यांनी केलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नुकतेच रूग्णालयातून घरी परतले आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांची ममता बॅनर्जी यांच्यासोबतची भेट रद्द झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट रद्द झाली असली तरी ममता बॅनर्जी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावणार आहेत.

You might also like