आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली, मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत ; मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे असून जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या शतकाचा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ”पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली. मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत.” सध्या प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी नव्हे एवढ्या वाढल्या आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगर नंतर बिकानेरमध्येही पेट्रोल 100 रुपयांच्याही पार गेले आहे. पेट्रोल 100.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.09 रुपये प्रति लिटरवर गेले आहे.

दरम्यान देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment