मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये गावाला जाणार; दुर्घटनाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महापूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये या गावात दरड कोसळून अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची विचारपूस करणार आहेत.

उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील आणि गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 38 गावकऱयांचा मृत्यू झाला. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांना या महाकाय दरडींनी गिळंकृत केले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अनेकांचे संसार या दरडींखाली कायमचे गाडले गेले.

Leave a Comment