अखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधि सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment