ठाकरे सरकारच्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांना नेमकी कशी मदत मिळणार?
१)मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
२)ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे. म्हणजे ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.
३)अतिवृष्टीमुळं फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा
४)दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे.
५)मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं विभागवार विभाजन
१)रस्ते आणि पूल – २ हजार ६३५ कोटी
२)नगरविकास – ३०० कोटी
३)महावितरण उर्जा – २३९ कोटी
४)जलसंपदा – १०२ कोटी
५)ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – १ हजार कोटी
६)शेती आणि घरांसाठी – ५ हजार ५०० कोटी
एकूण – ९ हजार ७७६ कोटी रुपये

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment