भाजपचा नकली भगवा, बुरखा फाडायला हवा; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्त्व नाही असे म्हणत युती शिवसेनेने नव्हे तर भाजपने तोडली अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर घणाघात केला. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना खंभीरपणे काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले

आम्ही छुपी युती करत नाही. विरोध असो वा पाठिंबा, आम्ही समोरून देतो असे उद्धव ठाकरेंनी म्हंटल. शिवसेनेने झेंडा, रंग युती कधीही बदलली नाही. हिंदुत्त्वाच्या गप्पा मारणाऱ्यानी मेहबुबा मुफ्ती सोबत युती कशी केली असा सवाल करत भाजपचा नकली भगवा, बुरखा फाडायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल

बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने युती केली होती तर भाजपची ४० हजार मते कुठे गेली असं म्हणत भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे.

 

 

Leave a Comment