Saturday, March 25, 2023

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा नक्की कोणाला इशारा ??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली जात आहे. त्याचा पहिला प्रोमो खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत दिसले. जास्त अंगावर याल तर मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अगदी जबरदस्त शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात भाजपचा उल्लेख करण्यात आला नसला तरी आक्रमक भाषेत घणाघात करण्यात आले आहेत. कोणी कितीही आडवे आले तर त्यांनाच आडवे करून हा महाराष्ट्र पुढे जाईल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’