मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनानगरमध्ये दाखल; कोयना धरणाची करणार पाहणी

कोयनानगर । सकलेन मुलाणी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोयनानगराच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात ते कोयना धरणाची पाहणी करणार आहेत. थोड्यावेळापूर्वीच उद्धव ठाकरे कोयनानगर येथे पोहोचले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पोकळी गावाची पाहणी करून उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कोयनानगर येथे दाखल झाले. यानंतर उद्धव ठाकरे कोयना धरणाच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोयनानगर दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, आणि शंभूराज देसाई आहेत. थोडया वेळापूर्वी हे सर्वजण कोयना धरणाकडे रवाना झाले आहेत. धरणाच्या पाहणीवेळी उद्धव ठाकरे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’