ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याला दिली मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आघाडीवर कार्यरत असलेल्या आशा सेविकांना ठाकरे सरकारनं अखेर दिलासा दिला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात राज्य सरकारकडून आशा सेविकांनाही मदतीला घेण्यात आलं आहे. त्यामुळे आशा सेविकांना देण्यात येणारा मोबदला वाढवण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीवर अखेर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार आशा सेविकांच्या मानधनात दरमहा २ हजार रुपये तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा ३ हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ७१ हजार आशा सेविका कार्यरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर अनेक विषयांना मंजुरीही देण्यात आली. यात आशा सेविका व आशा गटप्रर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय घेत सरकारनं त्यांना दिलासा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment