व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद; पहा Live अपडेट्स

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही असं ठाकरे म्हणालेत.

यापेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का. मात्र मला वाटतं तशी गरज येणार नाही. ज्या वेगाने रुग्णवाढ होत होती त्याच वेगाना आज 10 लाख सक्रिय रुग्णसंख्या असती. निर्बंध घालणं अवघड होतं. पण जी शक्यता होती. ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे असं ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अजून कडक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मगील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. आपण चाचणीची क्षमता वाढवत आहोत. आपण चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण काही जंबो कोविड सेंटर उभारले आहेत.