हिंमत असेल तर मर्दासारखे या अंगावर, शिखंडीला मध्ये आणू नका; मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात विविध विषयांवर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवरून निशाणा साधला. ईडी आहे की घरगडी आहे अस म्हणत कितीही कारवाई करा, मी घाबरणारा नाही असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मर्दासारखे या, शिखंडी ला मध्ये घेऊ नका. माझ्यावर कितीही कारवाई करा, मी कोणाला घाबरणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. जे जे भाजपचे नेते सांगतात की हा तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाईल, हे काय ईडी चे दलाल आहेत का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करताय. पण तुमचा पहाटेच्या शपथविधी चा कार्यक्रम यशस्वी झाला असता तर याच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला असता असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.