हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज शिवसेना भवन येथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी त्यानी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले, आधी नाथ होते, आता दास झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दुसर्यांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका केली. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र असल्याने मला अधिक प्रेम मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. बंडखोरांनी त्यांचा निर्णय घ्यावा. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल. मी गद्दाराना पुन्हा पक्षात घेणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

शिंदेंच्या गटाचे नाव- शिवसेना बाळासाहेब गट

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांनी आपल्या गटाला शिवसेना बाळासाहेब अस नाव दिले आहे. शिंदे गटाने आपल्या नावात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख केल्याने शिवसैनिक संतप्त होण्याची शक्यता आहे. तसेच या नावावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यानंतर यापुढील लढाई कोर्टात होऊ शकते. शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब अस नाव आपल्या गटाला दिल्याने शिवसैनिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment