औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे वादळी सभा झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतरावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आपल्या सभेत या विषयावर भाष्य करत सूचक विधान केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न माझ्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. हे मी विसरलेलो नाही आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केल्याशिवाय मी राहणार नाही. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल, संभाजीराजेही म्हणतील चल तुला रायगडावर नेऊन टकमक टोक दाखवतो. त्यामुळे फक्त या शहराचं नामांतर न करता संभाजीराजेंना आदर्श वाटेलअसं हे नगर करुन दाखवीन त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

ते पुढे म्हणाले, चिखलठाण येथे होणाऱ्या विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याबाबतचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आम्ही आम्ही केंद्राकडे दिला आहे. पण केंद्र सरकारने अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. विमानतळाचे नामकरण केंद्राकडून का होत नाही ?? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला.

Leave a Comment