जव्हारलाही धावपट्टी उभारू, मग हवी तेवढी विमाने उडवा! मुख्यमंत्री ठाकरेंचा राज्यपालांना उपरोधिक टोला

जव्हार । जव्हारलाही धावपट्टी उभारू. मग हवी तेवढी विमाने उडवा, असा उपरोधिक टोला राज्यपालांना लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार दौऱ्यात पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील सर्व तपशील मी उघड करतो, असा चिमटा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काढला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी जव्हार प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, धरणांची उंची वाढवणे, प्रकल्पांची दुरुस्ती यावर त्यात चर्चा झाली. तसेच ढापरपाडा, जव्हारचे कुटीर रुग्णालय, जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवंद येथील घरकुलाची त्यांनी पाहणी केली आणि रुग्णांची विचारपूस केली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like