ब्रेकिंग! मुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊन बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता; उच्चस्तरीय बैठक बोलावल्याने चर्चांना उधान

मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामुळे मुख्यामंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. मुख्यंमत्री ठाकरेंनी बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठक काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी ठीक ५ वाजता सदर बैठक होणार आहे.

मुख्यमंत्रीच घेतील लॉक डाऊनचा निर्णय : राजेश टोपे

गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन संदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. लॉक डाऊन चा निर्णय तूर्तास घेण्यात आलेला नाही मात्र कडक निर्बंध लावण्यात येतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. तसेच लॉक डाउन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही राजेश टोपे म्हणाले होते. गुरुवारी राज्यात 43 हजार 183 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई मध्ये खबरदारी म्हणून काही निर्बंध लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र लोकल बंद होणार नाही. केवळ गर्दी कशी कमी ठेवता येईल असा प्रयत्न राहील असे सांगितले आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी लोकलच्या सेवेवर काही निर्बंध आणावे लागतील असे म्हणत शहरात मिनी लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.

You might also like