मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणी भागात तौत्के चक्रीवादळामुळे  मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (21 मे) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहे. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावाही घेणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?

सकाळी 8.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन

सकाळी 8.40 वाजता तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

सकाळी 9.40  वाजता  हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन, नंतर गाडीने वायरी तालुका मालवणकडे जाणार

सकाळी 10.10 वाजता वायरी, ता.मालवण येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी 10.25 वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी 11.30 वाजता  चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे गाडीने आगमन आणि नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक

चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंती, झाडं कोसळली. तोक्ते चक्रीवादळामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काही लोक या वादळात जखमी झाले आहेत.

तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment