हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूर रवाना झाले.ते आपल्या कुटुंबियांसह मंगळवारी पहाटेच विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत.
खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहामधून रुक्मिणी मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होती. रात्री २.२० मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापुजेस ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने रावाना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्या सोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत.