आता रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षा रक्षकाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता.

काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्ग झाला होता. या दोघांची तब्बेत आता बरी असल्याची माहिती मिळते आहे. तर आता रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला करोनाची बाधा झाली आहे.

याआधीही मातोश्री परिसरातल्या काही पोलिसांना करोनाची लागण झाली होती. तर खबरादारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच गाडी चालवत असून त्यांनी त्यांच्या कार चालकालाही रजा दिली आहे. नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेले जवान आणि पोलिसांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment