कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा, समाधानी आहात का? शिवभोजन थाळी कशी आहे? योजना आवडली का? सरकार स्थापन होवून आज दोन महिने पूर्ण होत आहेत; केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, हे सर्व आशीर्वाद घेण्याचे काम आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे संवाद साधला.
२६ जानेवारी रोजी आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छता यांच्याशी अजिबात तडजोड नको अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधतांना दिल्या.
दरम्यान, रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली. मुख्यमंत्री म्हणाले, ”जमणार आहे ना हे काम तुम्हाला? आशीर्वाद घेण्याचे काम आहे! आपली संस्कृती आहे.अन्नदाता सुखी भव! म्हणण्याची. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी माहिती दिली. प्रारंभ केल्यापासून या ठिकाणी १०० टक्के थाळ्या संपत आहेत. समोरच महापालिकेचे सावित्रीबाई फुले रूग्णालय असल्याने शिवभोजन योजनेचा खूप चांगला फायदा होत आहे. यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, योग्य त्या सुविधा दिल्या जातात का ते पहा आणि त्यांना सहकार्य करा. शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय यातच मला आनंद आहे. असे सांगून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.
आण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पध्दतीने काम करा. यावेळी उपस्थितांनी त्याला दाद दिली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या
जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ नवीन नियमाने सामन्यांचे निकाल बदलणार?