खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

खासदार नवनीत राणा मेळघाटातील चुरणी या गावाच्या दौर्यावर असताना तेथील बँकेबाहेर लागलेल्या लोकांची रांग पहिली आणि त्यांनी लोकांच्या तक्रारी जाणुन घेतल्या. यावेळी खात्यातील जमा रकमेची माहीती घ्यायची असल्यास बँक कर्मचारी दिरंगाई करतात, बँकेतुन १००० रूपये विड्रॉल करायचे असल्यास चार दिवस बँकेच्या चकरा माराव्या लागतात अशी माहीती उपस्थित नागरिकांनी त्यांना दिली.

याबाबत नवनीत राणांनी बँक कर्मचाऱ्यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे खासदार नवनीत राणांचा राग अनावर झाला. पाच वाजेपर्यंत मी इथेच थांबते. तोपर्यंत योग्य उत्तर मिळाले नाही तर बँक फोडुन टाकेल असा दमही दिला. त्यानंतर शेवटी 5 वाजता बँकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार नवनीत राणा तिथून निघाल्या.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

सत्ता असताना गोट्या खेळत होता का? जलील यांचे पंकजांवर टीकास्त्र

मोदी सरकार देशात हिंसाचार पसरवित आहे; राहुल गांधीचा आरोप

यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ नवीन नियमाने सामन्यांचे निकाल बदलणार?

Leave a Comment