महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना ह्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । संपूर्ण देशभरात महिला अत्याचारांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करत याबाबत पोलीस दलाला सूचना केल्या.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, ठाणे, औरंगाबाद (संभाजीनगर), नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलिस आयुक्त तसेच विशेष पोलिस महानिरीक्षकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, महिलांवरील अत्याचार व अन्य संबधित प्रकरणांवर तातडीने कारवाई केली जावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्भया फंड मधील निधीचा विनियोग करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचना केल्या.

त्याचसोबत पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न तसेच पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर केल्यास त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Comment