कोकणाच्या मातीत बाभळीची झाडंही उगवतात; मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. नारायण राणे यांनी सुरुवातीला विविध मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात राणेंच्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

एवढे वर्ष विमानतळाला का लागले एवढी खऱडीघाशी भांडी घाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन, पर्यंटन, पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटले असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

Leave a Comment