मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातुन डिस्चार्ज; 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ‘वर्षा’वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता.  हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला होता. राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला होता. नुकतंच नव्याने आलेल्या ओमीक्रोन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाला तातडीने आदेश दिले होते.

Leave a Comment