मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर; जाणून घेणार दरडग्रस्तांच्या व्यथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यात पाहणी परिस्थितीचा आढावा घेतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून,मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरडग्रस्तांना भेट देऊन त्यांना धीर देतील.

सकाळी ११.३० वाजता त्यांचे कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल त्यानंतर ११.४० वाजता कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस ते भेट देऊन पूरग्रस्तांची संवाद साधतील. दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतील

You might also like