Friday, June 2, 2023

शिवाजी महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद सर्वत्र उमटतं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटकला ठणकावल आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अनादर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.

तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे असे मुख्यमंत्री म्हणाले.