Monday, February 6, 2023

राज्यातील मंदिरे आजपासून खुली; मुख्यमंत्री सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील बंद असलेली मंदिरे तब्बल दीड वर्षानंतर सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी देवीची पूजा केली. यावेळी महापौर, उपमहापौरही दर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजाऱ्यांशी संवाद साधला. “आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे, की आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

दरम्यान, गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर राज्याचे परळी वैजनाथ या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले.