व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सध्या तरी मास्क हीच आपल्यासाठी उत्तम लस -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची लस अजून उपलब्ध नसल्याने सध्या तरी मास्क हीच आपल्यासाठी उत्तम लस ठरणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटलआहे. करोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता राखण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरेपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे उद्घाटन ऑनलाइन प्रणालीने केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पाहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास मुंबईतून पालकमंत्री ॲङ अनिल परब, जालन्यातून  सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे, रत्नागिरीतून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहण बने,  आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.

कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही आपली प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा  प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’