आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना आपण आंधळेपणाने समर्थन देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

या कायद्यामधील  त्रुटी, उणीव दूर करणे गरजचे आहे, अशी भुमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मांडली.  केंद्र सरकारच्या या कायद्यांवर विचारविनिमय करुन धोरण निश्चित करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी  बैठक सह्याद्री अतितीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली ही भुमिका मांडली. या बैठकीस अनेक शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते. शेतकरी हितासाठी  आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरीही एकत्र आलो पाहिजे अशी आमची भुमिका आहे. हे कायदे  करण्यापुर्वी  सर्वांना विश्वासात घेऊन तसेच किमान शेतकऱ्यांच्या संघटनांसमवेत अगोदर चर्चा होणे गरजेचे होते असे त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले.

विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही, पण शेतकऱ्यांसबंधातील यापुर्वीच्या विविध कायद्यांच्या  अंमलबावणीसंदर्भातील अनुभवांची देवाणघेवाण  होणे गरजेचे होते. शेतकरी संघनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करुन आराखडा तयार करुन राज्यात कायद्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment