व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून CNG ‘एवढ्या’ रुपयांनी महागणार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने 6 रुपये 30 पैशांनी सीएनजीचे प्रति किलोचे दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा सीएनजीचे दर वाढविण्यात येणार आहे. पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून सीएनजीचे प्रति किलो ६ रुपयांनी पुन्हा दरवाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति किलो मागे 68 रुपये मोजावे लागणार आहे.

सीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून 62.20 रुपये प्रति किलोवरून 68 रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. हि दरवाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयात करण्यात येणाऱ्या वायूच्या वाढीचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे. त्यामुळे हि दरवाढ करण्यात येत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’ सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा व्हॅट दर 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता. त्यामुळे राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले होते.

त्यामुळे सीएनजी प्रतिकिलो 6 रुपये 30 पैशांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात या विशिष्ट वायूची किंमत जोपर्यंत कमी होत नाही. तोपर्यंत दरवाढ अशीच राहणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी स्पष्ट केले आहे.