औरंगाबाद | सीएनजी पर्यावरणासाठी नुकसानदायक नाही. हि बाब लक्षात घेता. सर्वत्र सीएनजीच्या वापरावर सर्व जगभरात भर दिली जात आहे. सीएनजीचे फायदे लक्षात घेत . औरंगाबाद शहरातही लवकरच सीएनजी पंप भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांच्या प्रयत्नाने सुरु होणार आहे.
वाहनधारकांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या सीएनजी पंप आठ ते नऊ महिन्यात सुरू होणार असल्याची आनंदवार्ता भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी आज हॅलो महाराष्ट्राची बोलताना दिली
औरंगाबादकर देखील मुंबईकरान सारखे स्वप्न बघत आहे की आम्हीपण मुंबई सारख्या सिटीमध्ये सीएनजी लाईन घराघरापर्यंत असावी. सीएनजीचा फायदा असा आहे की सीएनजी घरगुती गॅस अपेक्षा कमी दराने अनेकांना उपलब्ध होते महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठी औरंगाबाद शहराला आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सीएनजी लाईन औरंगाबादकराना देखील मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.