CNG PNG Price | सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या अति मुसळधार पावसामुळे मुंबईमधील जनजीवन ठप्प झालेले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गाड्या देखील काही बंद केलेल्या आहेत. या आधीच मुंबईकरांवर एक नैसर्गिक संकटच आहे. आणि त्यात आता पुन्हा एकदा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण इथून पुढे त्यांच्या खीसाला जास्त कात्री लागणार आहे. कारण आता महानगर गॅस लिमिटेड सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किमतीत वाढ केलेली आहे. हे नवे दर (CNG PNG Price) आजपासून म्हणजेच 9 जुलैपासून अमलात येणार आहेत. सीएनजी हा 1.50 रुपयांनी वाढलेला आहे तर पीएनजी 1 रुपयांनी महाग झालेला आहे. त्यामुळे आता नागरिकांना वाहन चालवण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.
नव्या दर्यानुसार मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी (CNG PNG Price) 75 रुपये आणि घरगुती पीएनजीसाठी 48 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये सीएनजीचे दर कमी आहे. तरी देखील आता मुंबईतील बऱ्याच टॅक्सी आणि रिक्षा सीएनजीवर चालत असल्याने प्रवास आता महागणार आहे. त्याचप्रमाणे गृहिणींना देखील आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजी दरात बदल केलेले आहे.
सध्या सिएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाली असली, तरी हे इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे. गॅस सीएनजीची किंमत मुंबई पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये 50 टक्के तर पीएन 17 टक्क्यांनी स्वस्त आहे.