व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोचिंग क्लासमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये कोचिंग क्लासमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण (Boy beaten) केली आहे. ही मारहाण इतकी संतापजनक होती, की या घटनेचा व्हिडीओ व्हायरल गावातल्या लोकांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकालाच नंतर बेदम मारहाण (Boy beaten) केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कोचिंग क्लासमध्ये एका वर्गात हा शिक्षक इतर मुलांच्या देखत एका पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करताना दिसत आहे.

शिक्षकाचे फटके खात असताना हा विद्यार्थी कळवळत होता. त्याच्या किंचाळणं काळीज पिळवटून टाकणारं होतं लाकडाच्या फळीने एकामागोमाग एक फटके या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लगावले. शिक्षकाच्या जोरदार प्रहारानं विद्यार्थी कळवळू लागला. रडू लागला. पण शिक्षकानं मारहाण करणं काही थांबवलं नाही. इतकाच काय, तर नंतर काठी ठेवून हाताने मुलाच्या कानशिलातही शिक्षकाने लगावली. त्याने हा विद्यार्थी फरशीवर कोसळला. हा मुलगा बेशुद्ध होईपर्यंत शिक्षकाने त्याला जबर मारहाण (Boy beaten) केली. यादरम्यान वर्गाच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने हि घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोचिंग क्लासमधील शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर कसंबसं करुन विद्यार्थ्याने जीव वाचण्याच्या इराद्याने वर्गातून पळ काढला.

नेमकी कुठे घडली घटना?
ही धक्कादायक घटना बिहारच्या पाटणामधील धनरुआ या ठिकाणी घडली आहे. ज्या क्लासेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आणि सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली जाते. शनिवारी छोटू नावाच्या एका शिक्षकाला एका शुल्लक कारणावरुन राग आला. विद्यार्थ्यावर आलेला राग या शिक्षकानं इतक्या भयंकर पद्धतीनं व्यक्त केला, की वर्गातील सगळेच विद्यार्थी हादरुन गेले होते.

शिक्षकाला ग्रामस्थांची मारहाण
विद्यार्थ्याला मारहाण करणारा हा शिक्षक शॉर्ट टेम्पर्ट होता. त्यानं केलेलं कृत्य गावातील लोकांना कळल्यानंतर स्थानिकांनी या शिक्षकाला बेदम मारहाण (Boy beaten) केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या शिक्षकाचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
IND vs ENG : वन-डे आणि टी20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाकोणाचा आहे समावेश जाणून घ्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!