Coal Ministry Recruitment 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना लहानपणापासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते . आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मंत्रालयाने तरुण व्यवसायिकांसाठी भरतीची सूचना देखील जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत 3 पदे भरली जाणार आहेत .या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही कोळसा मंत्रालयाच्या (Coal Ministry Recruitment 2024) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया करू शकता. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही त्या तारखे अगोदरच अर्ज करावा.
वयोमर्यादा
कोळसा मंत्रालय भरती अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे वय हे 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
शैक्षणिक पात्रता | Coal Ministry Recruitment 2024
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून खाण अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर असणे गरजेचे आहे.
मासिक वेतन
कोळसा भरती मंत्रालय भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
निवड प्रक्रिया कशी होईल
कोळसा मंत्रालय भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही कोणत्याही प्रकारचे लेखी परीक्षा न देता होणार आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीत द्वारे निवड केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा