हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Coastal Road And Sea Link मुंबईमध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे आता खाजगी वाहनांची संख्या देखील वाढतच चाललेली आहे. या वाहनांची मुंबईमध्ये सतत आपल्याला कोंडी होताना दिसत असते. त्यामुळे लोकांची कामे देखील वेळेवर होत नाही. या मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी, यासाठी प्रशासन नेहमीच काही ना काही प्रयत्न करत असतात. प्रशासनाने आतापर्यंत मुंबईत मेट्रो, उड्डाणपूल असे अनेक वाहतुकीचे पर्याय उभे केले आहेत. आता मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड आता सी लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पोस्टल रोडवरून थेट वरळी सीलिंगवर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी देखील कमी होणार असल्याची शक्यता आहे. या पुलाचे काम सध्या चांगलेच वेगाने सुरू आहे आणि काही दिवसातच गर्डर बनवण्यात येणार आहे.
वरळी सीलिंक (Coastal Road And Sea Link) जोडण्यासाठी पिलर 7 आणि 9 मध्ये देशातील सर्वात मोठा आणि 30 बोईंग जेट वजनात एवढा 2000 टनांचा आणि आर्क गडर 2 ते 3 दिवसात बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील हा एक मोठा टप्पा आहे. बोर गार्डन हा संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर पुढील 100 वर्षे टिकेल इतका मजबूत केला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा गर्डर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील भरती आणि आहोटीच्या वेळा पाहूनच ही सगळी कामे करण्यात येणार आहेत.
336 मीटर एवढा लांब असलेल्या या गर्डरमुळे आता कोस्टर आणि वांद्रे वरळी सी लिंक यांतील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या गर्डरचे एकूण वजन 2000 टन एवढे असणार असून त्याची लांबी 136 मीटर एवढी असणार आहे. पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर या आधीच लॉन्च करण्यात आलेले आहे. तर या एप्रिल महिन्यात उर्वरित दोन गर्डर लॉन्च करण्याची शक्यता आहे.
मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टाकता सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लवकरच प्रियदर्शनी पार्क ते वरळी या दरम्यान कोस्टर रोड मेपर्यंत खुला करण्याचे देखील नियोजन आहे. आणि त्या दृष्टीने सध्या काम देखील चालू झालेले आहे. या सीलिंक आणि कोस्टल रोड कनेक्ट झाल्यानंतर थेट दक्षिण मुंबईत जाता येणार आहे. वांद्रेमधून दक्षिण मुंबई देणाऱ्या वाहनांना सध्या सी लिंक वरळी येथे संपतो. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न उभा राहणार नाही. मे महिन्यापर्यंत या पुलाची सगळे कामे संपवण्यात येणार आहेत.