नारळाचे लाडू

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | लाडू हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. आपल्याकडे सणाला अनेक प्रकारचा लाडू बनविले जातात. त्यातलाच लाडूचा एक प्रकार म्हणजे नारळाचे लाडू. हे लाडू खोबऱ्यापासून बनविलेले असल्याने पौष्टिक तर असतातच त्याचबरोबर लहान मुलांना तर फारच आवडतील.

साहित्य –
१) २ वाट्या बारीक केलेलं सुक खोबर
२) ५० ग्राम कंडेन्सड मिल्क

कृती –
सर्व प्रथम एका पॅन मध्ये सुके खोबरे भाजून घ्या. खोबरे २ मिनिटे भाजून झाल्यावर त्यात कंडेन्सड मिल्क मिसळा व २-३ मिनिटे चांगले परतून घ्या. मिश्रणाचा चांगला गोळा झाला की गॅस बंद करा.
हाताला तूप लावून मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या. लाडूला वरून सुके खोबरे लावा,
तयार आहेत झटपट नारळाचे लाडू.