Saturday, March 25, 2023

औरंगाबादमध्ये कॉफीमुक्त अभियान सुरु ; गुलाबाचे फुले वाटून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्षभर अभ्यास करूनही इंग्रजीच्या पेपरला जाताना विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक असते. मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती घालविण्यासाठी तसेच उत्साहपूर्ण वातावरणात पेपर सोडविण्यासाठी गारखेडा परिसरातील कन्या विद्यालय केंद्रात कॉफिमुक्त अभियान उपक्रम राबविण्यात आला. परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. इंग्रजीची मनात भीती बाळगू नका, दडपण घेऊ नका असा संदेश देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी इयत्तेच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता इंग्रजीचा पेपर होता. नियोजित वेळेनुसार विद्यार्थी केंद्रावर हजर झाले. येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांना धक्काच बसला. केंद्रातील शिक्षक मंडळी हातात गुलाबाचे फुल घेऊन हजर होते. कोणीतरी पाहुणे येणार असतील, अशी चर्चाही रंगू लागली. विद्यार्थ्यांना आत सोडण्यासाठी शाळेची घंटी वाजताच विद्यार्थी आतमध्ये जाण्यास सज्ज झाले.

- Advertisement -

जसे विद्यार्थ्यांना गेटमध्ये सोडले जाऊ लागले तसे प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना गुलाब देऊन स्वागत करू लागले. इंग्रजीच्या पेपरची चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, पेपर शांतपणे वाचून काढा, मग सहजतेने उत्तर लिहा अशी सूचनाही शिक्षक मंडळी देऊ लागले. हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांसह पालकही आश्चर्यचकित झाले.