Cold And Cough | पावसाळ्यात सर्दी-खोकलासाठी करा घरगुती ‘हे’ उपाय; चुटकीसरशी मिळेल आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cold And Cough | पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. या पावसामध्ये सर्दी आणि खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यात असणारे जिवाणू आणि विषाणू संसर्ग झपाट्याने वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना खोकला, सर्दी या गोष्टींची लागण होत असते. परंतु ही सर्दी आणि खोकला होऊ नये किंवा झाल्यानंतर काय काळजी घ्यावी? हे माहीतच असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखातून सर्दी आणि खोकला ( Cold And Cough) झाल्यानंतर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि डॉक्टरकडे जावे लागणार नाही.

चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा |  Cold And Cough

सर्दी, ताप आणि फ्लू टाळण्यासाठी, आपण आपल्या चेहऱ्याला सतत स्पर्श करू नये. वारंवार नाक आणि तोंडाला हात लावण्याची सवय असते. याशिवाय मास्क वापरा आणि कुटुंबातील कोणाला खोकला किंवा सर्दी होत असेल तर त्यांच्यापासूनही योग्य अंतर ठेवा.

उकळलेले पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात आजार होण्याचा धोका असतो. या ऋतूत कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी फक्त उकळलेले पाणी प्या. याशिवाय सकाळी उठून कोमट पाणी लिंबू, लेमन ग्रास, मध किंवा पुदिन्यासोबत रिकाम्या पोटी प्यायल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.

वाफ घेणे

पावसाळ्यात वाफ घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे छातीत साचलेला श्लेष्मा तर बाहेर पडतोच पण त्यामुळे बंद केलेले नाक सहज उघडण्यासही मदत होते. यासाठी, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गरम पाण्यात लवंग तेल किंवा टी ट्री ऑइल घालून वाफ देखील घेऊ शकता, कारण त्यात अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत

गार्गल करणे

खोकला किंवा सर्दी झाल्यास गार्गल करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाकून चांगले मिसळा. आता तुम्ही या पाण्याने दिवसातून दोनदा गार्गल कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होत नाही.