सातारच्या ढोल्या गणपती मंदिराची पडझड : नागरिक आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहराचे ग्रामदैवत असलेल्या ढोल्या गणपती मंदिराची दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी स्वयंभू गणेश मूर्ती असून ती आठ ते दहा फूट इतकी असल्याने तिला ढोल्या गणपती असे नाव आहे. या मंदिराची पडझड थांबवण्यासाठी व मंदिर जीर्णोद्धारासाठी सातारकर नागरिक एकवटले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सध्या या मंदिराची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी लाकडी बांबू लावून आधार देण्यात आला. मंदिराच्या भिंतीला मोठे तडे गेले असल्याने त्यात साप, घोणस यासह अन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. मंदिरावरील पत्रा पूर्णपणे सडला आहे. पावसाळ्यात या मंदिरास पूर्णपणे गळती लागलेली असते. येथील पुजारी दरवर्षी स्वखर्चाने याची डागडुजी करत आहेत. याठिकाणी दर्शनास येणारे भाविक हे जीव मुठीत धरून दर्शन घेत आहेत. श्री गणपती देव (ढोल्या गणपती) देवस्थान या नावाने सात विश्वस्तांचा ट्रस्ट आहे. या ट्रस्टमधील एकच विश्वस्त हयात असून बाकी मयत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे या ट्रस्टची पुन्हा नव्याने बांधणी करुन या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा. वर्षानुवर्षे जीर्णोद्धार बोर्ड लावला जातो मात्र, पुढे काहीच होत नाही. जर मंदिर डागडुजी किंवा जीर्णोद्धाराचे काम करणे जमत नसेल तर त्यांनी सांगावे आम्ही भक्तगण पुढे येऊन करण्यास तयार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिली.