कौतुकास्पद| जिल्हाधिकारी असावा तर असा! मोठा निर्णय घेताना बाजूला ठेवली प्रतिष्ठा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी कोरोनाला गंभीरतेने घेणे जरा सोडलेच. लोकांनी अनेक नियम कोरोनाच्या काळामध्ये धाब्यावर बसवले गेले. नियम तोडून त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम आणि लग्न समारंभ उरकून घेतले गेले. अशा वातावरणामध्ये महाराष्ट्रात करीनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्ध्या अनेक शहरांमध्ये निर्बंध वाढवले जात आहेत. सोबतच तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. अश्यातच औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

26 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कन्या पायल चव्हाण यांचा विवाह होणार आहे. या विवाहाचे आयोजन औरंगाबाद शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केले आहे. लग्नाचा स्वागत समारंभसुद्धा त्याच दिवशी आयोजित केला होता. त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले होते. पण कोरोणाच्या वाढत्या संख्येमुळे आणि शासनाने गर्दी न करण्याचे केलेल्या अवाहनामुळे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी स्वागत समारंभाचा कार्यक्रम रद्द केला आहे.

राज्यामध्ये सद्ध्या करोणा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, विदर्भ आणि इतर काही शहरात संख्या वाढत आहे. अश्या वातावरणात शासनाने कडक नियम केले आहेत. आणि ते पाळण्याचे आवाहनही केले आहे. लग्न समारंभाला 50 लोकांसाठी परवानगी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आपल्या कन्येचा विवाह शासनाच्या नियमाप्रमाणे करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’