कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दिव्यांग बांधवांना शासनस्तरावरून मिळणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी 5% टक्के निधीस जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग सर्वे करण्याच्या कारणास्तव स्थगिती आदेश दिल्याने दिव्यांग बांधवांच्या हक्कावर गदा आली होती. यामुळे सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी हवालदिल होऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांचेकडे धाव घेतली व कैफियत मांडली. सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सदर निधी वाटपाची स्थगिती उठवून सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी यांना शासन निर्णय व सुचनांप्रमाणे निधी खर्च करण्यात यावा, असा दिलासादायक आदेश पारित केला आहे.
दिव्यांग बांधवांच्या व्यथा समजून घेऊन सदर दिव्यांग कल्याणकारी 5% टक्के निधी वाटपास दिलेली स्थगिती उठवून हा निधी सुरळीतपणे उपलब्ध करून देत दिव्यांग बांधवांच्या समस्या निवारण करुन न्याय द्यावा. यासाठी दि. 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. सदर निवेदन प्रमाणात सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांना जो आदेश मिळणे अपेक्षित होते.
या निर्णयाचे दिव्यांग बांधवांनी स्वागत करुन सातत्याने पाठपुरावा केलेल्या व दिव्यांगाचा आधार ठरलेल्या नवाज सुतार, कराड मुख्याधिकारी रमाकांत डाके, विभाग प्रमुख गणेश जाधव, रेपाळ मॅडम, नगरपालिकेचे प्रशासन यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी सतीश पाटील, समीर संदे, अजित भोसले, सरफराज बागवान आदी मान्यवर व दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.