सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा अद्याप ही चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट आहे. आज नव्याने काढलेल्या आदेशात शैक्षणिक साहित्य 14 जून पासून घरपोच मिळणार आहे. तर शेतीविषयक दुकाने आणि शेतीचे कामे आठवड्यातील सर्व दिवस चालू राहणार आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केवळ शैक्षणिक साहित्य 14 जून पासून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत घरपोच पुरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरवणाऱ्या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतीतील कामे करण्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. शनिवार व रविवार पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दूकाने पूर्ण बंद राहणार आहेत.
सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 11.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील 2)अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील 3)सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील 4)हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील 5)सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार) 6) अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील 7)शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती 8) स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील 9) कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही 10) लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक 11) राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील 12)ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील 13)कृषी कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. 14)ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील 15)सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही 16)बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही 17)संचारबंदीचे नियम लागू राहतील