केजयेथील महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

केज | केज येथील महाविद्यालयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेची केज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

19 वर्षीय तेजल संपत चव्हाण ही तरुणी अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेजल हिने शहरातील धारूर रोड भवानीनगर येथे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या घरात छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती सध्या आजोबांकडे राहते. तिचे आई वडील अहमदनगर येथे काम करत आहेत.

तेजलचे नात्यातील तरुणाशी काही दिवसानंतर लग्न ठरले होते. मुलीच्या आजोबांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार 174 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार महादेव गुजर व मंगेश भोले करीत आहेत. तिच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकेल नसून तिला कुठल्या प्रकारचा ताण अथवा त्रास होता का याची माहिती पोलीस घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like