महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली । इस्लामपूर येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना घडलेली आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सदरील घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर येथील एका महाविद्यालयात शिकणारी कु. अंकिता धनंजय कांबळे (वय 23, रा. सध्या – डांगे कॉलेज बस थांब्याजवळ, रावळ कॉलनी, आष्टा, मुळ गाव बिळाशी, ता. शिराळा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. अंकिता हिचे आई-वडील मुंबईत असतात. लहानपणापासूनच ती मामा भानुदास कांबळे यांच्याकडे आहे.

अंकिता हिने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा केलेला आहे. पोलीस आत्महत्यचे कारण जाणून घेण्यासाठी तपास काम करत आहे.

You might also like