कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात 42 वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सावात जिल्ह्यातील 46 महाविद्यालयातून 1 हजारावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. युवा महोत्सावात साताऱ्याने आपले वर्चस्व राखले. सातारच्या 4 महाविद्यालयांनी 6 सांघिक स्पर्धात प्रथम क्रमांक पटकावत डंका वाजवला आहे. तर तीन स्पर्धांमध्ये कराडच्या दोन महाविद्यालयांनी बाजी मारली आहे.
स्पर्धेतील निकाल कला प्रकारानुसार अनुक्रमे पुढीलप्रमाणे
लोककला- सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, दहिवडी कॉलेज दहिवडी
लोकनृत्य – यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, मुधोजी कॉलेज फलटण, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा.
मुकनाट्य – दहिवडी कॉलेज दहिवडी, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा, मुधोजी कॉलेज फलटण.
नकला- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मुधोजी कॉलेज फलटण.
वादविवाद – डी पी भोसले कॉलेज कोरेगाव, गव्हरर्मेंट कॉलेज इंजिनिअरिंग कराड, इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा .
सुगमगायन- गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मुधोजी कॉलेज फलटण.
लोकसंगीत वाद्यवृंद- मुधोजी कॉलेज फलटण, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, डी पी भोसले कॉलेज कोरेगाव.
लघुनाटिका – धनंजय गाडगीळ कॉलेज सातारा, मुधोजी कॉलेज फलटण, आमदार शशिकांत शिंदे कॉलेज मेढा
एकांकिका – शंकरराव जगताप कॉलेज वाघोली सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे.
समूहगीत- मुधोजी कॉलेज फलटण, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड.
पथनाट्य- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड, किसनवीर महाविद्यालय वाई, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड.
प्रश्नमंजुषा- यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, डी पी भोसले कॉलेज कोरेगाव
मराठी वक्तृत्व – आर्टस अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
हिंदी वक्तृत्व – डी पी भोसले कॉलेज कोरेगाव, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा, मुधोजी कॉलेज फलटण
इंग्रजी वक्तृत्व- गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड, सद्गगुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा.
कराड येथील एसजीएम काॅलेजमध्ये लोककला व लोकनृत्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या दोन्ही प्रकारातील कलेला विद्यार्थ्यांनी भरपावसात जोरदार प्रतिसाद दिला. अनेक लोकनृत्य व लोककला डोळ्याचे पारणे फेडणारे अश्याच ठरल्या. अनेक गाण्यांना व डान्सना वन्समोअर मिळाला.