Colon Cancer In Younger People | आपला भारत देश पुढे चालला आहे. नवीन प्रगती होत आहेत. तंत्रज्ञान देखील विकसित होत आहे. तसतशा मानवाच्या शारीरिक अडचणी मात्र वाढत चालल्या आहेत. सध्या जगभरात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार कॅन्सर हा जगातील सगळ्यात वेगाने वाढणारा आजार आहे. आणि हा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 40 पेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांमध्ये कोलोन कॅन्सरचा धोका आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.
या अलार्मिंग ट्रेंडमुळे युएस प्रिव्हेटिव्ह सर्विस स्टार फोर्सने कोलन टेस्ट करण्याचे सुरुवातीचे वय आता कमी केले आहे. पहिले 50 वर्षानंतर खोलून कॅन्सरचा धोका होता. परंतु आता 45 सहाव्या वर्षाच्या आधीच करून कॅन्सरची (Colon Cancer In Younger People)तपासणी करून घेण्याची गरज आहे. असे त्यांनी सांगितलेले आहे. भारतामध्ये प्रति लाख माणसाच्या मागे 4.4 व्यक्तींना खोलून कॅन्सर आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
बहुतेक प्राण्यांच्या शरीरात आतडे असते. त्यामध्ये अन्न शोषले जाते आणि त्यातून शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. आपल्या शरीरातील सर्वच कामे ही त्याच ऊर्जेने करू शकतो. अन्न शोषल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ हळूहळू मोठ्या आतड्यांमध्ये सरकतो त्याला कोलोन असे म्हणतात. जेव्हा एखाद्या कोलोनमध्ये कर्करोग होतो तेव्हा तो बुद्धाशयात पसरतो म्हणजेच त्याला कोलोन कॅन्सर असे म्हणतात.
कोलन आपल्या शरीरातील मोठ्या आतड्याचा सर्वात लांब भाग आहे. ज्यामुळे त्यात कॅन्सर झाला की वाढायला वेळ लागतो. त्याची सुरुवातीला लहान गाठी पासून होते. यामध्ये कोणत्या भागात पेशीच्या काही भाग बाहेर पडतो त्याला. पॉलिफ म्हणतात. हा भाग कर्करोग नसलेला असतो. अनेक लोकांमध्ये ते कर्करोगाच्या पेशींमध्ये बदलते.
जागतिक आरोग्य संघटनेने 2020 म्हणजे मध्ये जागभरातील कोलन (Colon Cancer In Younger People) कॅन्सरच्या 1.9 मिलियन पेक्षा अधिक नव्या केसेस समोर आणल्या आहेत. यामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला ते सांगण्यात आलेले आहे. आत्ताच केलेल्या अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की तरुणांमध्ये या कोलोन कॅन्सरची संख्या वाढवताना दिसत आहे आता आपण अशी काही लक्षणे पाहूया ज्यामुळे कोलोन कॅन्सर झाल्याचे समजते.
आतड्यांच्या सवयीत बदल
तुम्हाला तुमच्या आतड्यांच्या हालचालीमध्ये अचानक बदल झाल्याचे दिसल्यास तसेच अतिसार बद्धकोष्ठता जास्त काळ जाणवल्याने त्याकडे त्वरित लक्ष द्या आणि डॉक्टरांकडे जा.
शौचास अर्थात स्टूलमध्ये रक्त
तुम्हाला तुमच्या स्टूलमध्ये किंवा टॉयलेटमध्ये रक्त दिसल्यास डॉक्टरकडून तपासणी करून घेणे खूप गरजेचे आहे. जरी हे मुळव्याधामुळे होत असले तरीही ते कोलन कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते.
पोट दुखी
पोटात सतत वेदना होणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. हे देखील कोलोन कॅन्सरचे एक मोठे लक्षण आहे.
अचानक वजन कमी होणे | Colon Cancer In Younger People
कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे हे देखील कोलन कर्करोगाच्या समस्यांचे एक लक्षण आहे. तुम्ही तुमच्या आहारात किंवा दिनचर्येत कोणताच बदल केला नाही तरी देखील तुमचे वजन कमी झाले, तरी देखील हे खूप गांभीर्याने घेतले पाहिजे.
थकवा जाणवणे
पुरेशी झोप घेऊ नये सतत थकवा जाणवत असेल तर कोलोन कॅन्सरचे हे लक्षण असू शकते वैद्यकीय तपासणीत असे समजले आहे की, कोलन कॅन्सरचा त्रास लवकर दिसून येत नाही. तो हळूहळू पसरतो त्यामुळे थोडा जरी त्रास झाला तरी त्याची तुम्ही तपासणी करून घेणे गरजेचे आहे.